देवगड : ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगडच्या वतीने प्राथमिक शिक्षक भवन येथे खुल्या व शालेय गटातील कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला कॅरमप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रकाश जनार्दन गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, उद्योजक हनिफशेठ मेमन, सचिव शरद लाड, माजी अध्यक्ष विजय जगताप, दत्तात्रय चव्हाण सर, सदस्य विनोद मेस्त्री, संतोष गुडेकर, शिवप्रसाद पेडणेकर, कमलाकांत भडसाळे, हिंदू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगडचे प्रकाश जाधव व राजेंद्र हिंदळेकर सर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
खुल्या गटात विकास वसंत कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. योगेश आनंदा कोळी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. चित्तरंजन गोविंद बाणे व अमोल अनिल पाटकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. शालेय गटात शुभम अनिकेत पेडणेकर याने प्रथम, तर गौरांग उमेश नाईकधुरे याने द्वितीय क्रमांक मिळवला. वेदांत संतोष नाईकधुरे व शावेज कमालुद्दीन शेख यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे खुल्या गटात सहभागी झालेल्या एकमेव महिला स्पर्धक देवगड हायस्कूलच्या शिक्षिका ए. पी. किरकिरे यांचा उत्स्फूर्त सहभाग. त्यांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. विजेत्यांना मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, सचिव शरद लाड, माजी अध्यक्ष विजय जगताप, सदस्य विनोद मेस्त्री, संतोष गुडेकर सर व कमलाकांत भडसाळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विलास रूमडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन शरद लाड यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विलास रूमडे, उल्हास मणचेकर, शरद लाड, विजय जगताप, विनोद मेस्त्री, श्रीकांत बिडये, गुडेकर सर, कमलाकांत भडसाळे, शिवप्रसाद पेडणेकर, योगेश कोळी, मेषक राणे, मनीष दळवी व सुशील रूमडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.