loader
Breaking News
Breaking News
Foto

डी.बी.जे. महाविद्यालयात ‘शैक्षणिक कार्यात एआयचा वापर’ या विषयावरील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे (स्वायत्त) महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग आणि स्टाफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘अकॅडेमिक कार्यातील एआयचा वापर शिक्षकांसाठी उपयुक्त आणि प्रात्यक्षिक अनुप्रयोग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विविध विभागांतील अनेक प्राध्यापकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत फ्लाइट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तसेच युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे संचालक प्रा. जहूर बोट आणि पल्लवी ताठरे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित विविध साधनांचा शैक्षणिक क्षेत्रात प्रभावीपणे कसा वापर करता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेले हे सत्र पूर्णपणे प्रात्यक्षिक स्वरूपाचे असल्याने उपस्थितांनी विविध एआय साधनांचा प्रत्यक्ष वापर करून अनुभव घेतला. त्यामुळे संपूर्ण कार्यशाळेदरम्यान प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. बापट, उपप्राचार्य आठवले, खवणेकर, कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. एस.पी. मोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. शिंदे आणि प्रा. बामणे यांनी मनोगत व्यक्त करून कार्यशाळेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाघ यांनी केले. विशेष म्हणजे, डी.बी.जे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या प्रा. जहूर बोट यांना त्याच महाविद्यालयात रिसोर्स पर्सन म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्याने हा क्षण अधिक संस्मरणीय ठरला. या कार्यशाळेच्या माध्यमातून युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरने कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात एआय साक्षरतेचा प्रसार करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी बळ दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg