खेड (प्रतिनिधी) : कोलबांद्रे जिल्हा परिषद गटातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या एसटी बसफेर्या पुन्हा सुरू करून ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जी.प. सदस्य प्रभाकर गोलांबडे, पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर आणि ममता शिंदे यांनी राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर यांनी नामदार योगेश कदम यांना निवेदन देत खेड- उन्हवरे वस्ती, उन्हवरे/मोगरेवाडी मुंबई रातराणी तसेच नालासोपारा खेड-फणसू-भडवलेअमार्गे वावघर भागणेवाडी रातराणी या एसटी सेवा कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी केली आहे. खेड-उन्हवरे बससेवा सुरू झाल्यास उन्हवरे परिसरातील नागरिकांसह शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच सायंकाळच्या वेळेत मुंबईहून रेल्वेने येणार्या प्रवाशांना खेडहून पुढे उन्हवरेकडे जाण्यासाठी ही बस अत्यंत सोयीची ठरणार आहे.
त्याचप्रमाणे नालासोपारा-खेड- फणसू-भडवले मार्गे वावघर-भागणेवाडी ही एसटी सेवा सुरू झाल्यास मुंबईहून पहाटे रेल्वेने येणार्या प्रवाशांना ग्रामीण भागात जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल. या मार्गावरील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रवासाची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच उन्हवरे - मुंबई बससेवा सुरू झाल्यास उन्हवरे व परिसरातील नागरिकांना मुंबई तसेच दापोली येथे ये-जा करण्यासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन कामांसाठी मुंबईकडे जाणार्या अनेक प्रवाशांना या सेवेमुळे दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची वाढती प्रवासी गरज लक्षात घेऊन या एसटी सेवा पूर्ववत करून त्या कायमस्वरूपी सुरू कराव्यात, अशी मागणी प्रभाकर गोलांबडे, नरेश घरटकर आणि ममता शिंदे यांनी केली असून, या मागणीवर नामदार योगेश कदम यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




























.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.