loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारपूरात विधी साक्षरता शिबिर; हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचे न्यायाधीशांचे आवाहन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने शृंगारपूर येथे आयोजित विधी साक्षरता शिबिरात कौटुंबिक वादांबाबत मार्गदर्शन करताना ए. एम. अंबाळकर यांनी मानसिक स्वास्थ्य, कुटुंबातील संवाद आणि परस्पर संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. कुटुंबातील एकमेकांवरील प्रभाव कमी होण्याची कारणे शोधणे, मुलांशी संवाद वाढविणे आणि नातेसंबंध जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांकडून चुका होत असतील, तर पालक म्हणून त्यामध्ये आपली भूमिका काय आहे, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.माझा हक्क आहे’ म्हणण्यापूर्वी तो खरोखरच आपला हक्क आहे का, याचा विचार करा असे आवाहन न्यायमूर्ती अंबावळेकर यानी उपस्थितlना केले. हक्क आणि कर्तव्यांची योग्य सांगड घालणे आवश्यक असून, केवळ हक्कांसाठी आग्रही राहण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे भान ठेवले पाहिजे. व्यक्तीने आपली ‘लक्ष्मणरेषा’ पाळल्यास अनेक कौटुंबिक व सामाजिक वाद टाळता येऊ शकतात. त्यामुळे कोणताही वाद न्यायालयात नेण्यापूर्वी तो सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, रत्नागिरी एस. जी. बावकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हक्क आणि कर्तव्ये ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाने आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडल्यास न्यायालयात जाण्याची वेळ कमी होऊ शकते. अहंकारामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. त्यामुळे परस्परांच्या हक्कांचा आदर करून कर्तव्याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे बावकर यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची माहिती देताना भारतीय राज्यघटनेतील कलम ३९(अ) नुसार पात्र व्यक्तींना मोफत कायदेविषयक मदत व वकील उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असल्याचे सांगितले. लोकअदालत व मध्यस्थीद्वारे वाद सामोपचाराने मिटविण्याचे काम केले जाते. दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. सुमित जोशी यांनी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व न्याय कुठे मागायचा, याबाबत माहिती दिली. विधीविषयक मदतीसाठी १५१०० हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो, तसेच पॅनेलवरील वकिलांकडून मोफत मार्गदर्शन मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. युवक-युवतींना पोक्सो कायद्याबाबत जागरूक करण्याबरोबरच पालकांनी मुलांशी संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. न्यायमूर्ती पी. एस. पाटील यांनी ‘वैकल्पिक वाद निराकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. मध्यस्थी आणि लोकअदालतीच्या माध्यमातून परस्पर संमतीने वाद मिटविल्यास वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो, असे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने शृंगारपूर येथे आयोजित विधी साक्षरता शिबिरात मार्गदर्शन करण्या साठी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ एस. जी. बावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश सुमित जोशी आणि सह दिवाणी न्यायाधीश पी. एस. पाटील यांनी नागरिकांना विविध कायदे, हक्क व कर्तव्यांबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराचे शृंगारपूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक मितीश केणी, पंचायत समिती सदस्य दत्ता लाखन, सरपंच बाबू पवार, राजेंद्र पांचाळ, महेश पवार, सानिका धांगडे, श्रेया पवार, दैवत पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र पोमेंडकर यांनी केले. ग्रामीण भागातील नागरिकांना हक्क, कर्तव्ये, कायदेविषयक मदत, लोकअदालत आणि मध्यस्थी याबाबत या शिबिरातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पोमेंडकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg