loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये प्रथमच सर्पमित्रांचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे गौरव

खेड, - नागपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे खेड शहरातील सर्पमित्रांचा प्रथमच भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. मधुपेय प्रोडक्ट, खेड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वन्यजीव संवर्धन, सर्प संरक्षण आणि जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्पमित्रांचा गौरव करण्यात आला. यावेळी ओंकार चिखले, जय पासवान, अनमोल भोसले, सर्वेश पवार, रोहन खेडेकर, युवराज मोरे, हृतिक पाटील, प्रेम ठोकरे, अथर्व मगदूम आणि डॉ. विरेंद्र चिखले या सर्पमित्रांचा सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे यांनी केले. अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांनी आपल्या मनोगतात सर्पमित्रांच्या धाडसी व समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यावरण संवर्धन आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वासाठी सर्पमित्रांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे उपस्थितांना पटवून दिले. सर्पमित्रांच्या वतीने सर्वेश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना, “इतक्या वर्षांत प्रथमच सर्पमित्रांचा अशा प्रकारे सन्मान होत आहे. हा आमच्यासाठी अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव आहे,” असे सांगत लायन्स क्लबचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

या सन्मान सोहळ्यास खजिनदार ला. संदीप मोरे, माजी अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष ला. मिलिंद तलाठी, माजी अध्यक्ष ला. राजेश जोयसर, ला. सागर चिखले, ला. विवेक कदम, ला. डॉ. वेद तलाठी, आयपीडीजी ला. डॉ. विरेंद्र चिखले तसेच इतर लायन्स सदस्य उपस्थित होते. खेडमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्पमित्रांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg