loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्णगड येथे शेकडो विद्यार्थाच्या उपस्थितीत शालेय समूह गायन स्पर्धा उत्साहात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - कै रक्मिणी भिकाजी डोर्लेकर स्मरणार्थ पूर्णगड येथिल श्री देव महापुरुष देवस्थान डोर्लेकर उर्फ वाघे, डायबा, डावखुरे, वासावे, आबेरकर परिवार भावकी बंधू खारवीवाडा आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त शालेय समूह गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी व्यासपिठावर लक्ष्मीकेशव विद्यालय फणसोप /कसोपचे चेअरमन साळवी, गावडे आंबेरे येथील विश्वेश्वर विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सांगवकर, मेर्वी मराठी शाळा मुख्याध्यापक भाटकर, दिनेश डोर्लेकर, रांगणकर, पूर्णगड मराठी शाळा क्र2 चे सावंत, परिक्षक पाटणकर, प्रवीण सावंत देसाई, तायशेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेमुळे विद्यार्थी वर्गाच्या टॅलेंटला वाल मिळतो आणि या मंडळाने विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला वाव दिला आणि व्यासपीठ निर्माण केले हेच नसे थोडके असे गौरवोदगार भाटकर यांनी काढले. अध्यक्षीय भाषणात मुलांना व्यासपीठ मिळून दिलेत आणि उदंड जल्लोषात हा कार्यक्रम झाला आणि उत्तम नियोजन केले गेले हेच आज पहायला मिळाले आणि या मंडळाने अतिशय सुंदर स्पर्धा घेवून देशभक्ताना व रसिक श्रोत्याना सलामीच दिली असे उदगार लक्ष्मी केशव विद्यालय फणसोपचे चेअरमन साळवी यांनी काढले. या स्पर्धेत 247 विद्यार्थी सहभागी झाले होते. अटीतटीच्या समूह गायन स्पर्धेत इयत्ता 1 ली ते 4 गटामध्ये प्रथम क्रमांक गावखडी शाळा पूर्णगड 1दृतीय क्रमांक, खारवीवाडा शाळा पूर्णगड क्र 2 तृतीय क्रमांक, आदर्श शाळा मेर्वी यांना तर इयत्ता 5 वी ते 7 वीच्या गटात प्रथम क्रमांक पूर्ण प्रा मराठी शाळा नाखरे दृतीय क्रमांक स्वामी स्वरुपानद विद्या मंदिर पावस तृतीय क्रमांक लक्ष्मी केशव विद्या मंदिर फणसोप उत्तेजनार्थ आदर्श मराठी शाळा मेर्वी यांनामिळाला.

टाईम्स स्पेशल

इयत्ता 8 वी ते 10च्या गटात प्रथम क्रमांक लक्ष्मी केशव विद्यालय फणसोप दृतीय क्रमांक विश्वेश्वर विद्या मंदिर गावडे आंबेरे तृतीय क्रमांक विश्वेश्वर विद्यामंदिर गावडे आंबेरे या सर्वाना मंडळाकडून रोख रक्कम व कै रुक्मिणी डोर्लेकर स्मरणार्थ स्वीटी विलास नाटेकर यांजकडून चषके व सर्व सहभाग विद्यार्थाना सायली केशव कुलवडे भाडूप यांज कडून शालेय भेट वस्तू अशी बक्षिसे मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या स्पर्धेमध्ये फणसोप नाखरे गावखडी पूर्णगड मेर्वी गावडे आंबेरे परिसरातील शाळेतील विद्यार्थी वर्गाने सहभाग नोंदवला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्ष मंदार डोर्लेकर, अनुज डोर्लेकर, दिपक डोर्लेकर, विनय वाघे, सुदर्शन आंबेरकर, विजय डावखुरे, रोहिदास डोर्लेकर, प्रणय वाघे, प्रथमेश वासावे आदी सदस्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg