loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडी दुर्घटनेत निंबाळकरांची ‘रेस्क्यू’ मदत ठरली मोलाची; दोन रबर बोटी, प्रशिक्षित बोटचालक व संपूर्ण पथकासह शोधकार्यात सक्रिय सहभाग; बाबल अल्मेडा पथकाकडून विशेष कौतुक

दोडामार्ग(प्रतिनिधी)- घोटगेवाडी येथे कॉजव्यावरून दोन जण वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेसाठी आवश्यक साधनांची गरज निर्माण झाली असताना माजी उपसभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या दोन रबर बोटी, प्रशिक्षित बोटचालक आणि संपूर्ण मनुष्यबळ शोधकार्यासाठी उपलब्ध करून दिले. निंबाळकर यांच्या या तत्पर मदतीमुळे शोधमोहीमेला महत्त्वाचे बळ मिळाले. सह्याद्री ऍडव्हेंचर रेस्क्यू टीमचे प्रमुख बाबल अल्मेडा यांच्या नेतृत्वाखालील पथक, आंबोली-सांगेली येथील रेस्क्यू टीम, स्थानिक नागरिक तसेच निंबाळकर यांचे पथक शोधकार्यात सहभागी झाले. निंबाळकरांची संपूर्ण टीम सलग दोन दिवस घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्यात सक्रिय होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रेस्क्यू ऑपरेशन सुरू करताना सुरक्षेच्या दृष्टीने तिलारी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग तसेच तेरवण मेढे उन्नयी बंधार्‍यातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर दोन रबर बोटी पाण्यात उतरवून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांनी देखील रबर बोटीतून शोध पथकासोबत सहभागी होत प्रत्यक्ष शोधकार्यात सहभाग घेतला. दोन बोटींच्या सहाय्याने नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी शोध घेण्यात आला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकातील सदस्यांनीही शोधकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

टाइम्स स्पेशल

पहिल्या दिवशी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. यावेळी घोटगेवाडी कॉजव्यापासून अंदाजे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील एका ठिकाणी झाडाला अडकलेल्या अवस्थेत ८ वर्षीय बालकाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. मृतदेह बोटीद्वारे किनार्‍यावर आणण्यात आला व पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र, अजून एका व्यक्तीचा शोध सुरू असल्याने अंधार आणि नदीपात्रातील परिस्थिती लक्षात घेऊन रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg