loader
Breaking News
Breaking News
Foto

जावळे कोंडी नदीवरील बंधाऱ्यातून पाण्याची गळती

मंडणगड (प्रतिनिधी) : जावळे येथील कोंडी नदीवर पाण्यासाठी बंधारा बांधण्यात आलेला आहे. या कोंडी नदीवरील बंधाऱ्याच्या भिंतीतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या बंधाऱ्यात पाणी साठून राहणार नाही. मंडणगड तालुक्यातील जावळे या महसुली गावाच्या हद्दीतील कोंडी नावाच्या नदी ठिकाणी बंधारा बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पाण्याचा उपयोग हा गुरांना पाणी पिण्यासाठी शेतीसाठी तसेच काही प्रमाणात पिण्यासाठी सुद्धा होणार होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिंचघर जावळे आंबवली खार साखरी वेळास या मार्गालगतच असलेल्या या बंधाऱ्याकडे सहज कोणाचेही लक्ष जावे अशा ठिकाणी हा बंधारा बांधण्यात आलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे या बंधाऱ्यात आधीच गाळ साचला आहे त्यात पाणी गळतीच्या दुसऱ्या समस्येने डोके वर काढले आहे. त्यामुळे बंधारा असुन नसल्याच सारखा आहे. एकणुच पाणी टंचाईची भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्यात साचलेला गाळ काढणे आवश्यक होते.

टाईम्स स्पेशल

बंधाऱ्याच्या भिंतीतून वाहणाऱ्या पाण्याचा सिमेंट लावून बंधाऱ्याची सुधारणा करणे गरजेचे होते. मात्र ते झालेले नसल्याने बंधाऱ्यात पावसाळ्यानंतर पाणी टिकून राहणार नाही परिणामी पाणी टंचाईची समस्या अधिक गडद होणार आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनेने ही महत्वाची समस्या निकाली काढण्यासाठी किमान पाहणी करून पुढील वर्षी तरी पाणी बंधाऱ्यात साठून राहील याकडे लक्ष दिले पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg