खेड - कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत त्यांच्यावर योग्य उपचार आणि पोषण आहार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खेड तालुक्यात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुपोषित मुलांची (SAM/MAM) बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी तसेच पौष्टिक लाडू वाटप कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हे शिबिर १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी, ता. खेड येथे होणार आहे. या शिबिरासाठी RBSK वैद्यकीय अधिकारी, CDPO, PHC वैद्यकीय अधिकारी तसेच अंगणवाडी सेविकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
शिबिरामध्ये कुपोषित बालकांची वैद्यकीय तपासणी बालरोग तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे. विशेषतः SAM (Severe Acute Malnutrition) आणि MAM (Moderate Acute Malnutrition) या श्रेणीतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्या पोषणस्थितीनुसार आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. बालकांच्या वाढीचा आणि आरोग्याचा नियमित आढावा घेणे, तसेच गंभीर कुपोषणाची लक्षणे आढळल्यास पुढील उपचारासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावेळी कुपोषित बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात येणार असून, त्यांच्या आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करण्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी केवळ औषधोपचार नव्हे, तर संतुलित आणि पौष्टिक आहारही महत्त्वाचा असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालेराव तसेच डॉ. बालाजी सागरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संपर्कासाठी डॉ. विलास शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुपोषित बालकांनी शिबिराला उपस्थित राहून या आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच संबंधित अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक बालकांना शिबिरात उपस्थित करून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.