loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐनवरे येथील रेशनिंग गैरव्यवहाराबद्दल शासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील रास्त धान्य दुकान क्रमांक 43 च्या गैर कारभाराविरोधात आणि ग्रामस्थांच्या हक्कासाठी स्वतंत्र दिनाच्या दिवशी खेड तहसील कार्यालयाच्या आवारात सुनील बाबुराव जाधव आणि सुभाष रामचंद्र जाधव यांनी प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आपले आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर परवानाधारकाने रेशन दुकान हे नियमाचे उल्लंघन करून परस्पर स्वतःच्या खाजगी जागी सुरू ठेवल्यामुळे ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण होत होती, या उपोषणाची दखल घेत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेचे अधिकारी देशमुख व काळतोंडे यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून रास्त धान्य दुकानदाराची अनामत रक्कम दंड म्हणून जप्त करून रेशन दुकान पुढील आदेश होईपर्यंत मूळ जागेवर ऐनवरे बस स्टॉप या ठिकाणी चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

धान्यवाटप पारदर्शकतेसाठी पोलीस पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत केले जाईल व सुरक्षिततेसाठी दुकानात तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश लेखी देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg