loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळ्येतील धोकादायक झाड अखेर हटवले; ग्रामस्थांच्या मागणीला यश

तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील जीर्ण व धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पाळ्ये गावातील हरिजनवाडी येथील धोकादायक झाड अखेर हटवण्यात आले. तालुक्यातील धोकादायक झाडे हटवण्यासाठी बाबू गवस यांनी उपोषण छेडल्यानंतर गावागावांतील अशा झाडांचा प्रश्न चर्चेत आला आहे. पाळ्ये गावातील हरिजनवाडी येथील धोकादायक झाड हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आज वीज वितरण विभागाचे वायरमन कापडोसकर यांनी वीज वाहिन्या सुरक्षितपणे उतरवून घेतल्यानंतर संबंधित धोकादायक झाड हटवले. या कामासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेत मदतकार्य केले. झाड हटवल्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच वीज वाहिन्यांना असलेला संभाव्य धोका टळला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज वाहिन्या, रस्ते तसेच नागरिकांच्या वस्तीच्या परिसरात जीर्ण व धोकादायक झाडे असल्याने त्यांची प्रशासनाने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg