निवळी : निवळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ६२ विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने ग्रामस्थ, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षण सभापती नंदा मुरकर यांच्याकडे शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत शिक्षण विभागाने शिक्षिका रेवाळे यांची निवळी शाळेत नियुक्ती केली असून, त्या गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी शाळेत हजर झाल्या.
निवळी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात पहिली ते चौथीच्या वर्गात ३३, तर पाचवी ते सातवीमध्ये २९ विद्यार्थी आहेत. मात्र, एका शिक्षकाचे वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाल्याने तसेच दुसरे शिक्षक प्रशिक्षणासाठी गेल्याने शाळेतील अध्यापन व्यवस्थेवर परिणाम होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी दोन शिक्षकांची मागणी केली होती. निवळीचे उपसरपंच संजय निवळकर यांनी ग्रामस्थांची समस्या घेऊन शिक्षण सभापती नंदा मुरकर यांची भेट घेतली होती. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल शिर्के, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सदस्य संपदा नितोरे, स्वरांजली गावडे, प्रतीक्षा नितोरे, मनस्वी गावडे, संतोष खापरे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करत निवेदनही देण्यात आले होते.
या मागणीची दखल घेत शिक्षण सभापती मुरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षिका रेवाळे गुरुवारी निवळी शाळेत हजर झाल्याने ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान, सध्या नियुक्त झालेल्या शिक्षिका पुढील आदेश येईपर्यंत निवळी शाळेतच कार्यरत राहणार आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शिक्षक उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थ व पालकांनी समाधान व्यक्त केले असून, शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शिक्षण सभापती नंदा मुरकर यांचे आभार मानले आहेत.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.