दापोली (सागर गोवळे) : विलवडे रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासह स्थानकातील विविध सोयी-सुविधांच्या प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा ठाम निर्धार करत १९ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या तातडीच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर प्राथमिक स्वरूपात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाची जबाबदारी 'विलवडे रेल्वे प्रवासी संघटना' (मुंबई व ग्रामीण) यांनी संयुक्तपणे घेतली असून, परिसरातील प्रवाशांनी व नागरिकांनी या उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, या उपोषणानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाईल. तरीही मागण्या मान्य न झाल्यास २३ नोव्हेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे 'रेल रोको' आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. सर्व प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना विलवडे स्थानकात तात्काळ थांबा मिळणे. दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि खेड ते सावंतवाडी लोकल ट्रेन सुरू करणे. सुसज्ज वेटिंग रूम, प्रवासी शेड आणि स्वच्छतागृहांची निर्मिती. स्थानकाकडे येणारा रस्ता, पथदीप तसेच अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या रस्त्यावरील अंधार दूर करणे. सभेनंतर स्थानक प्रमुख सुबोध भाटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या बैठकीला लांजा तालुका पूर्व भाग आणि राजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व प्रवाशांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मुंबई संघटनेचे सल्लागार सुभाष लाड यांनी उपस्थित उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रवासी संघटनेची नवीन कार्यकारिणी व सल्लागार मंडळ जाहीर करण्यात आले.सल्लागार मंडळ: जगदीश राजापकर, दिलीपभाऊ पळसुलेदेसाई, आत्माराम चव्हाण, रवींद्र खामकर, डॉ. एस. व्ही. कदम, सत्यवान विष्णू खामकर, किशोर नारकर. अध्यक्ष अमोल मारुती रेडीज, उपाध्यक्ष सुरेश सिताराम शिगम, भास्कर श्रीपत खामकर, संतोष श्रीधर चव्हाण, सरचिटणीस दीपक तुकाराम तोरस्कर, सहचिटणीस राजेश विठोबा बेर्डे, खजिनदार अन्वर रखांगी, कार्यकारिणी सदस्य: प्रकाश तानू राजपकर, युवराज मारुती हांदे, संजय आयरे, विजय मुरलीधर कदम, विवेक विजय काटकर, काशीराम राजाराम राजापकर, शशिकांत महादेव खामकर, अमर गणपत खामकर, अजय आत्माराम चव्हाण, दीपक दत्ताराम कानसे, संतोष कदम, अमोल दीपक कदम, मंगेश दत्ताराम जाधव, प्रतीक प्रकाश मांडवकर, उमेश वामन खामकर... खासदार नारायणराव राणे, आमदार किरण (भैय्या) सामंत, पालकमंत्री उदय सामंत, प्रमोद जठार, रवींद्र चव्हाण आणि राम कदम यांच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून निवेदने देण्यात आली असून, त्यांच्या सहकार्याने स्थानकाचे प्रश्न सुटतील असा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.