loader
Breaking News
Breaking News
Foto

गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात सरपंच पाचकुडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

रत्नागिरी (जमीर खलफे) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गावच्या प्रथम नागरीक, सरपंच सौरभी पाचकुडवे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सौरभी पाचकुडवे यांनी ग्रामस्थ, आजी- माजी विद्यार्थी आदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेछा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पी. एन. जी. सराफ यांच्याकडून मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध, वक्तृत्त्व आणि रांगोळी स्पर्धा यांचा निकाल मुख्याध्यापिका स्नेहा पाटील यांनी जाहीर केला.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर तंबाखू मुक्त शपथ, व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकार सादर केले. सूत्रसंचालन निधी मोरे व अनघा रसाळ आभार मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg