loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी खा. विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी)-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी कणकवली विधानसभा समन्वयक सचिन सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून सचिन सावंत हे ओळखले जात होते. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेला धक्का बसला असून, त्यांच्यासोबत कणकवली तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालकमंत्री नितेश राणे यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ठाकरे शिवसेना कणकवली-देवगड माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत, कसवणचे माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, सतीश सापळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गांवकर, विलास सावंत, सखाराम घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, सुरेश गुरव, वैभव शेटये, सत्यवान मेस्त्री, अजित मेस्त्री, हळवलचे माजी उपसरपंच विष्णू ठाकूर, दिलीप ठाकूर, राज सावंत, मंगेश राजाध्यक्ष, उमेश मेस्त्री आदी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, वागदे सरपंच संदीप सावंत, वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच मिलिंद सर्पे, उपसरपंच भाई सावंत, चेअरमन प्रशांत सावंत, माजी सरपंच अशोक सर्पे, बंड्या मालंडकर, अभय गावकर, महेंद्र गावकर, गणपत मेस्त्री, उमेश गुरव, प्रमोद तेली, मॅक्सी फर्नांडिस, एकनाथ सावंत, लवू दळवी, संतोष सावंत, मनोहर नाधावडेकर, संतान फर्नांडिस, मंगेश गुरव, कृषी सेवा प्रतिनिधी दिनेश मेस्त्री, तुषार सर्पे, महेंद्र गुरव, प्रशांत तळवडेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg