loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख – परचुरी – फुणगूस बाजारपेठ मार्गावरील एसटी सेवेसाठी सुभाष लांजेकर यांचा पाठपुरावा; वाहतूक निरीक्षकांना निवेदन सादर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) : देवरुख–परचुरी–फुणगूस बाजारपेठ या मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष रमेश लांजेकर यांनी पुढाकार घेतला असून, या संदर्भात त्यांनी वाहतूक निरीक्षक सचिन रमेश सुर्वे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. देवरुख येथून सुटणारी एसटी बस सध्या परचुरी शाळा क्रमांक २ पर्यंत येत असल्याने फुणगूस आणि परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही बस पुढे फुणगूस बाजारपेठेपर्यंत वाढविण्यात यावी किंवा देवरुख– परचुरी–फुणगूस या मार्गावर नवीन एसटी सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फुणगूस आणि परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालय, पंचायत समिती, बँका तसेच इतर शासकीय कामांसाठी वारंवार देवरुख येथे जावे लागते. याशिवाय, अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज देवरुख येथे प्रवास करतात. फुणगूस येथे ग्रामीण रुग्णालय आणि बाजारपेठ असल्यामुळे परचुरी आणि परिसरातील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या मार्गावर एसटी सेवा सुरू झाल्यास हजारो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. या मागणीसाठी सुभाष रमेश लांजेकर यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यापूर्वीही परिवहन मंडळाकडे या संदर्भात अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली होती. सुरेंद्र श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी दोन वेळा परिवहन मंडळाकडे निवेदन सादर करून या मागणीला पाठिंबा दिला होता. तसेच गजानन नारायण जोशी यांनीही परिवहन मंडळाकडे निवेदन देऊन या मागणीचा पाठपुरावा केला होता.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, सुभाष रमेश लांजेकर यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रतही संबंधित विभागाकडे सादर करण्यात आली आहे. गावाच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सुभाष रमेश लांजेकर सातत्याने काम करत असून, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे देवरुख–परचुरी–फुणगूस बाजारपेठ मार्गावरील एसटी सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करावी अशी मागणी होतं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg