loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहरात इको सेन्सिटिव्ह झोनची गरज नाही; श्रीमंत खेम सावंत भोसले

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी शहरात नगरपरिषद स्थापन करून पर्यावरणाचे रक्षण आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी श्रीमंत बापूसाहेब महाराजांनी नगरपरिषदेचा कारभार जनतेच्या हाती सोपवला होता. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनची खरं तर गरज नसून, श्रीमंत बापूसाहेब महाराजांचे पर्यावरणविषयक धोरण अवलंबणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी केले. केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्याबाबत जनतेकडून हरकती व सूचना मागवल्या असून त्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर श्रीमंत खेम सावंत भोसले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युवराज लखमराजे भोसले आणि ऍड. शामराव सावंत उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पश्चिम घाट हा संपूर्ण परिसरासाठी ’ऑक्सिजन हब’ म्हणून काम करतो. त्यामुळे स्वतंत्र इको सेन्सिटिव्ह झोन लादण्याची कोणतीही गरज नाही. सावंतवाडीने आजवर नैसर्गिक आणि पर्यावरणाचा समतोल उत्तम प्रकारे राखून ठेवला आहे. हा समतोल साधत शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शहरात स्वच्छता आणि पर्यावरण टिकवून ठेवणे ही प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, असे आवाहनही श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी यावेळी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg