loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबस्ते केंद्रशाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : जिल्हा परिषद केंद्रशाळा कळंबस्ते नं. २ येथे ८० वा स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व स्पर्धांची बक्षिसे कळंबस्ते-भीमनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू तांबे यांनी पुरस्कृत केली होती. शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये राजू तांबे यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील घडशी, ग्रामपंचायत सदस्य संतोष जुवळे, सविता जुवळे, अभिनाथ आमकर, विजय सनगरे, शांताराम जुवळे, तसेच शाळेतील शिक्षक संदेश महाडिक गुरुजी, शेलार, गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी कळंबस्ते ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील घडशी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसह उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg