loader
Breaking News
Breaking News
Foto

बी.एस्सी. नर्सिंग परीक्षेत प्रथम क्रमांक; विशेष प्रावीण्य (O) ग्रेडसह उज्ज्वल यश

साटेली भेडशी (प्रतिनिधि) : मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर जानवी जयंद्रथ सासोलकर यांनी बी.एस्सी. नर्सिंग परीक्षेत तब्बल ८६.६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत घेण्यात आलेल्या या परीक्षेत त्यांनी विशेष प्रावीण्य (O) ग्रेड मिळवून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जानवी सासोलकर या श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग, तोंडवली येथील विद्यार्थिनी असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अभ्यासातील सातत्य, नर्सिंग क्षेत्राबद्दलची तळमळ आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “मेहनतीला गुणवत्तेची जोड मिळाली की यश निश्चित असते,” याचा प्रत्यय जानवी सासोलकर यांच्या या उज्ज्वल यशातून आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg