सावंतवाडी - केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपिडी सावंतवाडी मध्ये चालू होण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी १२ वाजता विशेष सभा बोलावून सर्व सदस्य यांची सहमती देऊन त्यांच्या अटी मंजूर करून तातडीने OPD चालू करावी असा ठराव मंजूर करून आयुर्वेद संस्थान ला पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या सुमारे ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी सुरू केलेले उपोषण अखेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी देव्या सूर्याजी यांना लेखी पत्र देत विविध मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. नळपाणी योजनेच्या कामाबाबत तृतीय पक्ष तांत्रिक लेखापरीक्षण (Third Party Technical Audit) स्थानिक नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन करण्यात येईल व त्याचा रिपोर्ट येईपर्यंत कंत्राटदार जगताप याचे पुढील काम स्थगित केले जाईल, काम बोगस आढळल्यास कंत्राटदार वर पुढील कारवाई केली जाईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच नगरपरिषद पाणी पुरवठा विभागात झालेल्या लाखोंच्या गैरव्यवहार बाबत पाणी पुरवठा समिती सदस्य व नगरसेवक देव्या सूर्याजी व उपोषणकर्ते दोन सदस्य यांची कमिटी नेमून विशेष सभा लावून चौकशी चा अहवाल सादर झाल्यानंतर दोषी आढळलेल्या संबंधितांवर तातडीने निलंबन ची कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. दरम्यान, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी औंधकरयांच्या बदलीचा मुद्दाही या आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्याशी चर्चा करून चंदगड येथील मुख्याधिकारी येत्या ८ ते १० दिवसांत सावंतवाडी नगरपरिषद मध्ये हजर होतील असे आश्वासन देव्या सूर्याजी यांना दिले. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आणि संजू परब यांनी बदलीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिल्यानंतर देव्या सूर्याजी यांनी उपोषण स्थगित केले आहे.
मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले व सर्व सभापती नगरसेवक यांनी देव्या सूर्याजी यांची भेट घेत सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असं आश्वासन दिले. याप्रसंगी सावंतवाडी नगर परिषदेचे नगरसेवक ॲड. नीता सावंत कविटकर, ॲड सायली, दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवेंद्र टेमकर, समीर वंजारी, बाबल्या दुभाषी, विनोद सावंत, प्रथमेश प्रभू, अनिकेत पाटणकर, भास्कर आमुणेकर, बबलू मिशाळ, जोसेफ आल्मेडा,सर्व पक्षीय पदाधिकारी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.