loader
Breaking News
Breaking News
Foto

सभापती, उपसभापतींची शिष्टाई, पालपेणे फाट्यावरील मोरीचे बांधकाम लवकरच लागणार मार्गी, महेश जाधव यांचे उपोषण मागे

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील पालपेणे फाटा येथील रस्त्याची उंची वाढविल्याने आणि शेजारील ओढ्याला लहान पाईप टाकल्याने दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात घुसण्याचे प्रकार सुरु आहेत. याप्रकरणी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे दाद मागूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने रहिवाशी महेश दिलीप जाधव हे स्वातंत्रदिनी गुहागर तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांनी संबंधित अधिकारी व पाटपन्हाळे ग्रामपंचायत यांना सदरील समस्या निवारण्यासाठी तसेच पुढील पावसात या घरांमध्ये पाणी घुसणार नाही यासाठी येथील पाण्याच्या ओढ्याला मोठे पाईप टाकण्याच्या सूचना दिल्या. येत्या डिसेंबरपर्यंत हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन संबंधितांनी देत तशाप्रकारचे पत्र उपोषणकर्त्यांना ग्रामपंचायतीने दिल्याने सुरु असलेले उपोषण थांबविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी महेश दिलीप जाधव यांनी माजी सभापती सुरेश सावंत यांच्या हस्ते पाणी घेऊन उपोषण थांबवले. यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, तहसिलदार परीक्षित पाटील, माजी सरपंच संजय पवार, सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg