रत्नागिरी : जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावणारे गिर्यारोहक अखिल स्मिता रवींद्र काटकर यांचा रत्नागिरीतील विविध गिर्यारोहण संघटनांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. अखिल काटकर यांनी २१ मे २०२६ रोजी गिरिप्रेमी संस्थेच्या अन्य दोन सहकाऱ्यांसमवेत माऊंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील गिर्यारोहण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या साहसी कार्याची दखल घेत विविध गिर्यारोहण संघटनांनी एकत्र येत त्यांचा गौरव केला.
या सन्मान सोहळ्याला रत्नागिरीतील गिर्यारोहण क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, गिर्यारोहक, साहसप्रेमी तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी अखिल काटकर यांच्या एव्हरेस्ट मोहिमेचे कौतुक करत त्यांच्या पुढील साहसी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. अखिल काटकर हे गिर्यारोहक आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून, लहान मुलांसाठी गिर्यारोहण व साहसी प्रशिक्षण उपक्रमांमध्येही ते योगदान देत आहेत. गिर्यारोहणासोबतच मॅरेथॉन, ट्रायथेलॉन आणि विविध साहसी क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
एव्हरेस्टसारख्या जगातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई करणे ही अत्यंत आव्हानात्मक कामगिरी मानली जाते. कठीण हवामान, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि अत्यल्प ऑक्सिजन अशा आव्हानांवर मात करत अखिल काटकर यांनी मिळवलेले हे यश अनेक तरुण गिर्यारोहकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. रत्नागिरीतील गिर्यारोहण क्षेत्रातील विविध संघटनांनी एकत्र येऊन केलेला हा सन्मान अखिल काटकर यांच्या साहसी कार्याचा गौरव तर आहेच; त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील गिर्यारोहण चळवळीला प्रोत्साहन देणारा आणि नव्या पिढीला साहस, शिस्त, तंदुरुस्ती व ध्येयपूर्तीची प्रेरणा देणारा उपक्रम ठरला.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.