संगमेश्वर (सत्यवान विचारे) : गेल्या चार दशकांहून अधिक काळ ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेने सर्वसामान्य रुग्णांची गेली ४३ वर्षे अविरत रुग्ण सेवा करणारे, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना माफक दरात उपचार देतानाच अनेक वेळा आर्थिक मदतीचा हात पुढे करणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर यांच्या हस्ते तर सन्मानचिन्ह, मानपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा सोहळा हॉटेल सनराईजच्या सभागृहात हा उत्साहात पार पडला. या वेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे, डॉ. चंद्रकांत यळगुडकर, त्यांच्या पत्नी सौ. नेहा येळगुडकर, डॉ. यळगुड श्रकर, बंधू डॉ. माधव यळगुडकर, त्यांच्या पत्नी सौ. मानसी तसेच ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संगमेश्वर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन एखाद्या डॉक्टरच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करणे, हेच डॉ. यळगुडकर यांच्या चार दशकांच्या सेवाकार्याची व्याप्ती आणि लोकांच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर अधोरेखित करणारे आहे, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी कोळंबे येथे वैद्यकीय सेवेचा प्रारंभ करणार्या डॉ. यळगुडकर यांनी त्या काळातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात रुग्णसेवा केली. त्यावेळी अनेक खेड्यांमध्ये रस्ते, वीज, दूरध्वनी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. मोबाईल तर दूरचीच गोष्ट होती. अशा परिस्थितीत रात्री-अपरात्री मोटारसायकलवरून शक्य तितक्या अंतरापर्यंत जाऊन, पुढे पावसात, चिखलातून वाट काढत ते रुग्णांच्या घरी पोहोचत आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उपचार करीत. कोळंबेनंतर कडवई, देवरूख आणि संगमेश्वर येथेही त्यांनी आपली वैद्यकीय सेवा सुरू केली. रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याच्याकडे उपचारासाठी पैसे आहेत की नाही, यापेक्षा प्रथम त्याच्यावर उपचार करणे याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
गंभीर रुग्णाला स्वतःच्या मोटारसायकलवरून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाणे, पुढील उपचारासाठी किंवा प्रवासासाठी पैसे नसल्यास स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करणे, अशा अनेक प्रसंगांतून डॉ. यळगुडकर यांनी माणुसकीची सेवा जपली. संगमेश्वर तालुक्यात सुमारे चार दशकांपूर्वी पहिली रुग्णवाहिका घेण्याचा पुढाकारही डॉ. यळगुडकर यांनी घेतला. रुग्णवाहिका घेतल्यानंतर स्वतः वाहन चालवत त्यांनी संपूर्ण तालुक्यात ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचे काम त्यांनी त्या काळात केले. आज वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक कारणांमुळे बदलला असला, तरी पैशापेक्षा रुग्णाच्या जीवाला प्राधान्य देणार्या डॉ. यळगुड श्रकर यांचे कार्य या क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार अमृत जाधव यांनी केली, तर सूत्रसंचालन श्रीकृष्ण खातू गुरुजी यांनीछान कविता करत केले. यावेळी विषेश उपस्थिती लाभाली ती डॉक्टर यांचे पुतणे डॉ, गणेश यळगुडकर, त्यांची मोठी भगिनी मीरा कुलकर्णी, त्यांचा मुलगा डॉ, विशाल आणि त्यांची पत्नी प्राजक्ता कुलकर्णी यांच्यासह संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.