loader
Breaking News
Breaking News
Foto

पेजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत हर घर तिरंगा मोहीम यशस्वीरित्या संपन्न

रत्नागिरी - लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत १३ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण, भित्तीपत्रक, सेल्फी पॉईंट, हर घर तिरंगा जनजागृती रॅली आणि ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रत्येक स्पर्धेत सचोटीने सहभाग दर्शवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हर घर तिरंगा अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रत्येक उपक्रम आणि स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक संस्थेचे अध्यक्ष सुरेश भायजे, संस्थेचे सचिव राजस मोहिते, प्रभारी प्राचार्य ओंकार लिंगायत यांनी केले. या सर्व उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांचे सहकार्य लाभले. हर घर तिरंगा अंतर्गत राबवलेल्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.अमित पवार यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. एकंदरीत हर घर तिरंगा अभियान विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीरित्या संपन्न झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg