loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत डिजीटल अरेस्ट, ६५ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांना गंडा

रत्नागिरी : डिजिटल अरेस्ट आणि मनी लाँड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका ६५ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला तब्बल ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील तेलीआळी येथील शिवनेरी घरामध्ये राहणार्‍या मधूश्री विलास पुनसकर या सेवानिवृत्त महिला आहेत. दि.१३ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत त्यांना काही सायबर भामट्यांचे फोन आले होते. फोन करणार्‍या भामट्यांनी स्वतःची ओळख नीरज कुमार आणि प्रदीप जयसवाल अशी दिली. तसेच आपण मिनिस्ट्री ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे भासविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भामट्यांनी मधूश्री पुनसकर यांच्या नावावर असलेल्या आधारकार्डशी लिंक असणार्‍या मोबाईल क्रमांकाच्या विरोधात देशविरोधाच्या भरपूर तक्रारी दाखल असल्याचे त्यांना सांगितले. या गंभीर गुन्ह्यामुळे पोलिसांकडून तात्काळ अटकेची कारवाई होऊ शकते, अशी भीती सायबर चोरांनी त्यांच्या मनात निर्माण केली. या प्रकरणात अडकवू नये आणि सुटका करून घेण्यासाठी, फिर्यादी व त्यांच्या पतीच्या नावावर असणारी सर्व ठेवी मनी लाँड्रिंगमधून घेतल्या आहेत का?, याची पडताळणी करावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. तसेच फंड पुन्हा परत करण्याचा विश्वास देऊन भामट्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून एकूण ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपये उकळले.

टाईम्स स्पेशल

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मधूश्री पुनसकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोबाईल क्रमांक वापरणार्‍या भामट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(क), ६६(ड) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे करत आहेत. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अशा अज्ञातांच्या फोन कॉलला आणि बनावट धमक्यांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg