लांजा (संजय साळवी) - कोकणातील पारंपरिक शक्तीतुरा लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या लांजा तालुक्यातील विवली गावचे सुपुत्र तथा मुंबई मंत्रालय येथे शासकीय सेवेत असणारे शाहीर विकास लांबोरे यांच्या कलाप्रवासाची अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दखल घेतली असून मुंबई येथे शक्तीतुरा कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या समाजप्रबोधनाने प्रभावित होऊन तुकाराम मुंढे यांनी शाहीर लांबोरे यांची नुकतीच भेट घेतली. मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या रंगमंचावर सादर करण्यात आलेल्या शक्तीतुरा कार्यक्रमात शाहीर विकास लांबोरे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर अर्थात धडाडीच्या होणाऱ्या कारवाईंवर आधारित प्रबोधनपरगीत सादर केले होते. हे गीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहोचले. मात्र या गीतापेक्षा शक्तीतुरा कलेचा पारंपरिक बाज आणि त्यातून समाजाला दिला जाणारा संदेश त्यांना अधिक भावला.
त्यानंतर मुंढे यांनी स्वतः शाहीर लांबोरे यांच्याशी संपर्क साधून भेटीची इच्छा व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) मुख्यालय वांद्रे - कुर्ला संकुल, मुंबई येथे त्यांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये शक्तीतुरा लोककला, तिची परंपरा आणि या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याच्या विविध पैलूंवर मनमोकळी चर्चा झाली. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाहीर विकास लांबोरे यांचे कौतुक करत शक्तीतुरा कार्यक्रमाच्या माध्यमातून असेच समाजप्रबोधन करत रहा आणि आपल्या पारंपरिक लोककलेचे जतन करा असा सल्ला दिला. तर लोककलेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, कोकणातील पारंपरिक लोककलेला आधुनिक रंगमंचावर स्थान देत तिच्या माध्यमातून सामाजिक विषय मांडणाऱ्या शाहीर विकास लांबोरे यांच्या कार्याची एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आवर्जून दखल घेत भेट घेणे ही शक्तीतुरा कलेच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या कौतुकामुळे शक्तीतुरा कलेला आणि ती जपणाऱ्या कलावंतांना नवी ऊर्जा मिळाली आहे.



















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.