loader
Breaking News
Breaking News
Foto

गोठे बोरखत नं १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका रजनी जाधव यांची केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती

मंडणगड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या गोठे बोरखत नं १ या शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या रजनी जाधव यांची खात्यांतर्गत विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती मिळाल्याने त्यांची देव्हारे केंद्रामध्ये केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बोरखत शाळा नं १ या शाळेत सलग १३ वर्ष ज्ञानदानाचे काम करून त्यांनी विद्यार्थी तर घडवलेच शिवाय त्यांनी गावाशीही आपले सौदाहर्याचे संबंध टिकवून ठेवले होते. एक विद्यार्थी प्रिय आणि पालक तसेच स्थानिक ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोपासलेल्या शिक्षकांप्रती नात्याचा कृतज्ञता व्यक्त करणारा त्यांचा सन्मानपूर्वक निरोप समारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोठे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला गोठे ग्राम पंचायतीच्या सरपंच तथा प्रशासक अंजली घागरूम, माजी सभापती दौलतराव पोस्टुरे, ग्राम पंचायत अधिकारी दिपक टेमकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय बोतरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश घागरूम, विनोद जाधव, रिया बंगाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीजा भुवड, गोठे गावचे अध्यक्ष शांताराम भुवड, गोठे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मराठे, धामणी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश बर्जे, बोरखत शाळेचे मुख्याध्यापक राकेश पंदीरकर, कळकवणे शाळा मुख्याध्यापक उंडे, गोठे खलाटी मुख्याध्यापक बडक, भगत आदींसह स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

मंडणगड तालुक्यातील एक अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष पदवीधर शिक्षिका रजनी जाधव या गणित आणि समाजशास्त्र या विषयाचे अदयापनाचे काम करत. त्यांनी स्कॉलरशिप, बी. डी.एस. सारख्या स्पर्धा परीक्षासाठी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करत त्यात त्यांना प्रावीण्य मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले. शाळेतील विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमात त्यांनी हिरीरीने भाग घेत त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळाच ठसा उमटवला होता. उपशिक्षिका म्हणून काम करत असतानाच त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आणि TET परीक्षेत उत्तम यश मिळवीत त्यांची याच तालुक्यातील देव्हारे केंद्रामध्ये केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg