loader
Breaking News
Breaking News
Foto

भजनी कलाकार दीपक आमकर यांचे अल्पशा आजाराने निधन

संगमेश्वर ( मकरंद सुर्वे ) : भजन सुरू होताच टाळ-मृदंगाच्या तालावर भक्तीचा रंग चढायचा... त्यांच्या आवाजाने वातावरण भक्तिमय व्हायचे... आणि त्यांच्या हसर्‍या चेहर्‍याने आपलेपणाची उब मिळायची. मात्र नियतीच्या एका कठोर वळणावर हा आवाज कायमचा शांत झाला. भजनी कलाकार तथा भजनी बुवा दीपक आमकर (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने गोळवली आमकरवाडी परिसरावर दुःखाची छाया पसरली असून, भजनी क्षेत्रासह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दीपक आमकर यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांच्या डोळ्यांत अश्रुू तरळले. कालपर्यंत आपल्यासोबत असलेला दीपक आज नाही, ही वस्तुस्थिती मनाला पटवून देणे त्यांच्या परिचितांसाठीही कठीण झाले आहे. त्यांच्या जाण्याने एका कलाकाराचा आवाज शांत झाला असला, तरी त्याहून मोठी हानी म्हणजे अनेकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा, आपुलकीने विचारपूस करणारा आणि मनमोकळेपणाने हसणारा एक जिवाभावाचा माणूस हरपला आहे. दीपक आमकर यांचे भजनाशी असलेले नाते केवळ गायनापुरते मर्यादित नव्हते. भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्याची साधना म्हणून त्यांनी भजनकलेकडे पाहिले. मृत्यूने दीपक आमकर यांचा जीवनप्रवास थांबवला; पण त्यांनी जपलेली कला थांबवता येणार नाही. त्यांनी जोडलेली माणसं, त्यांनी दिलेला प्रेमळ सहवास आणि त्यांच्या आवाजातून उमटलेली भक्ती पुढील अनेक वर्षे त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत राहील.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg