loader
Breaking News
Breaking News
Foto

वृक्षतोडीला परवानगी मिळालेल्या ठिकाणी पुन्हा वृक्षांची लागवड

दापोली (प्रतिनिधी) : विना परवाना वृक्षतोडीने पर्यावरणाचा समतोल ढासळला जातोय वगैरे म्हटले जाते ही एक बाजू झाली तर परवानगी घेऊन वृक्षतोड केलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने वृक्षांची लागवड केली जाणारी दुसरी बाजू कोणी लक्षातच घेत नाही. अधिकारी सक्षम आणि दक्ष असेल तर त्याचा धाकही तितकाच असतो. अशाच प्रकारचे महत्वाचे काम दापोली वन विभागाच्या माध्यमातून झाले आहे, याचे तालुक्यातील पर्यावरण प्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांना कारण परत्वे वृक्षतोडीची परवानगी अटी व शर्ती टाकून वन विभागाच्या माध्यमातून दिली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र एकदा का वृक्षतोडीची परवानगी मिळाली कि शेतकरी साधारणपणे पुन्हा नव्याने वृक्षांची लागवड करत नाहीत असे काही ठिकाणी घडत असलं तरी याला दापोली वनविभाग मात्र अपवाद ठरला आहे. ज्या ज्या ठिकाणी वृक्षतोडीची शेतकऱ्यांना परवानगी दिली गेली आहे त्या त्या ठिकाणी पुन्हा वृक्षांची लागवड करण्यात दापोली वन विभागाने कटाक्षाने लक्ष ठेवल्याने तेथे तेथे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील सुकोंडी येथील प्रगतशील शेतकरी दत्ताराम तुकाराम चव्हाण यांनी वनविभाग दापोली यांच्याकडून माहे ऑक्टोबर 2025 जून 2026 या कालावधीमध्ये वृक्षतोड परवानगी घेतली होती. सदर ठिकाणी व कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे दापोली तालुक्याचे वन अच्छादन अबाधित राहण्यासाठी आणि जैवविविधता टिकवण्याकरिता सदर शेतकऱ्यांने आंबा, काजू साग आदी प्रकारची ११० रोपे यावर्षीच्या पावसाळ्यात पर्यायी लागवड म्हणून लावली आहेत.

टाईम्स स्पेशल

याकामी वनविभागाचे वनरक्षक प्रभू साबणे यांनी लागवडी कामी मार्गदर्शन केले. सदर वृक्ष लागवडीतून त्या शेतकऱ्याला पुढे भविष्यात त्यांनी केलेल्या अशा या वृक्ष लागवडीचा आर्थिक फायदा नक्कीच होईल. वन विभाग दापोलीचे वनरक्षक प्रभू साबणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुकोंडी येथील दत्ताराम चव्हाण या शेतकऱ्याच्या जमिनीत नव्याने करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीसाठी तालुक्यातील व्यापारी किरण मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते, यातून वृक्षसंपदेचे संरक्षण करण्याचा सर्वांनी निश्चय केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg