loader
Breaking News
Breaking News
Foto

सानेगावच्या यशवंतखार हायस्कूलच्या नूतन इमारतीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

रोहा ( अंजुम शेट्ये ) रायगड रोहा तालुक्यातील श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळ सानेगाव संचलित सानेगुरुजी विद्यानिकेतन, यशवंतखार हायस्कूलच्या नूतन इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील ७२ लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी तटकरे यांनी ग्रामीण भागातील शाळांचा विकास हाच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया असल्याचे सांगत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षण मंडळाचे चेअरमन नंदूशेठ म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करताना विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी त्यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागणीनुसार नवीन बस उपलब्ध करण्यात येणार असल्याने पडम ते मेढा विद्यार्थ्यांना मोफत बससेवेचा लाभ मिळणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, रोहा पंचायत समितीचे उपसभापती संजय मांडसुसकर, अलिबाग विधानसभा कार्याध्यक्ष अडव्होकेट. मनोजकुमार शिंदे, तालुका कार्याध्यक्ष अनंतराव देशमुख, राजेंद्र पोकळे, युवा कार्यकर्ते मयूर खैरे, संतोष भोईर, संदीप चोरगे, नवनीत डोलकर, निर्मला वाघमारे, दिनाभाई मोरे शिक्षण मंडळाचे चेअरमन नंदकुमार म्हात्रे, सोनेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच परेश म्हात्रे, बाळू पाटील, मोहन ठाकूर, योगेश ठाकूर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ विवेक मोरे, मनोहर मोरे, राजेंद्र मोरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg