loader
Breaking News
Breaking News
Foto

पाकिस्तानी महिलेने जेव्हा अटलजींसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा वाजपेयीजींचे उत्तर अवाक् करणारे... राजनाथसिंह यांनी सांगितली आठवण

नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांची देशाभीमानी पंतप्रधान म्हणून ओळख आजही कायम आहे. १९ फेब्रुवारी १९९९ ला त्यांनी एक ऐतिहासिक लाहोर यात्रा शांती मार्गासाठी सुरु केली. ‘सदा-ए-सरहद’नामक उद्घाटन कार्यक्रमात दिल्ली ते लाहोर बससेवा त्यांनी सुरु केली आणि वाघा बॉर्डर पार करुन ते लाहोरमध्ये पोहोचले. यावेळी घडलेला हा किस्सा राजनाथ सिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात सांगितला. राजनाथसिंह यांनी अटलजींची जुनी आठवण ताजी केली. वाजपेयी यांनी या यात्रेदरम्यान लाहोर घोषणापत्रावर हस्ताक्षर केले होते. याचा हेतू परमाणू परिक्षणानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव कमी करण्याचा होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पाहिस्तानमधील एक अविवाहीत महिला वाजपेयींच्या भाषणाने इतकी प्रभावीत झाली की, तिने वाजपेयींसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. महिलेने याबदल्यात काश्मिर हुंड्यात देण्याची मागणी केली. वाजपेयींना तिने विचारले काय तुम्ही माझ्याबरोबर लग्न कराल, आणि त्याबदल्यात काश्मिर द्या,त्यावेळी हजरजबाबी वाजपेयी यांनी त्या महिलेला सांगितले की, लग्न करायला तयार आहे, पण हुंड्यात मला पूर्ण पाकिस्तान पाहिजे.

टाईम्स स्पेशल

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, वाजपेयी यांचे सेन्स ऑफ ह्यूमर कमालचे होते. त्यांनी आपल्या उत्तरात सहज हसत दिलेला प्रतिसाद असे स्पष्ट करतो की, कुटनीती आणि हजरजबाबीपणाने त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर कायम राहण्याची भूमिका बजावली. लाहोर समझोताचा पाकिस्तानने उल्लंघन केले होते. काही महिन्यानंतर कारगील युद्ध झाल्याने शांती प्रयास अयशस्वी झाले. कारगीर युद्धात भारताने पाकिस्तानला नामोहरम केले आणि विजय मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg