loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी मधून 75% रक्कम काढण्यासाठी नियम झाले सुलभ, आपत्कालीन गरजा पूर्ण होणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आंशिक विथड्रॉवलच्या (Partial Withdrawal) नियमांमध्ये मोठे बदल केले असून, यापुढे सदस्यांना वैद्यकीय उपचार, बेरोजगारी, शिक्षण आणि घरासंबंधी गरजांसाठी त्यांच्या पात्र पीएफ शिल्लकीतील 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. सुधारित ईपीएफ योजना 2026 अंतर्गत हे बदल करण्यात आले असून, त्याचबरोबर अंतिम सेटलमेंट आणि पेन्शन लाभांसाठी नव्याने प्रतीक्षा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी लोकसभेत ईपीएफ योजनेअंतर्गत सुधारित विथड्रॉवल तरतुदींबाबत सरकारकडे विचारणा केली होती. आंशिक आणि पूर्ण विथड्रॉवलचे नियम तसेच नव्या प्रतीक्षा कालावधीबाबत कर्मचारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून काही आक्षेप आले आहेत का, याचीही विचारणा त्यांनी केली होती. याला उत्तर देताना कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, EPFOने आंशिक विथड्रॉवल आणि अ‍ॅडव्हान्सशी संबंधित नियम सुलभ आणि उदार केले आहेत. सुधारित रचनेनुसार सदस्यांना लागू अटींच्या अधीन राहून पात्र ईपीएफ शिल्लकीतील 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येईल.

टाइम्स स्पेशल

वैद्यकीय आणीबाणी: स्वतःचे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी आवश्यकतेनुसार पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.बेरोजगारीच्या काळात: नोकरी सुटल्यास किंवा बेरोजगार झाल्यास तात्काळ २ तातडीच्या मदतीसाठी ७५% पर्यंत रक्कम लगेच काढता येते, तर उर्वरित २५% रक्कम १२ महिन्यांच्या सततच्या बेरोजगारीनंतर उपलब्ध होते. आपत्कालीन अग्रिम (Advance) रकमेसाठी सदस्यांना EPFO Official Portal वर जाऊन फॉर्म ३१ (Form 31) द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागतो.भविष्य निर्वाह निधी (Provident Fund - PF) ही नोकरदार लोकांसाठी एक महत्त्वाची निवृत्ती बचत योजना आहे. यात कर्मचारी आणि कंपनी दरमहा ठराविक रक्कम (सामान्यतः मूळ वेतनाच्या १२%) जमा करतात. ही योजना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देते आणि संकटकाळात पैसे काढण्याची सोय देते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg