रत्नागिरी: केवळ ढोल-ताशांच्या निनादात आनंद साजरा न करता सामाजिक उत्तरदायित्व जपत रत्नागिरीच्या 'शिवरुद्रा ढोल ताशा आणि ध्वज पथक'ने आपल्या दशकपूर्ती महोत्सवाचे अनोख्या उपक्रमाने स्वागत केले आहे. पथकाची स्थापना नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली असून, मागील १० वर्षांपासून हे पथक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. दशकपूर्तीचे औचित्य साधून यंदा काहीतरी सामाजिक कार्य करावे, या उद्देशाने पथकाने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराला रत्नागिरीतील नागरिकांनी आणि पथकातील वादक-सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून तरुणांनी व उपस्थितांनी रक्तदान केले. शिबिरात जमा झालेले सर्व रक्त जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले, जेणेकरून गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध होऊ शकेल. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला यावेळी विशेष प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन जणांचे प्राण वाचवू शकते. दशक महोत्सवाचा आनंद केवळ जल्लोषात साजरा करण्यापेक्षा समाजाचे आपल्यावर काहीतरी देणे आहे, ही भावना जपणे आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटले. म्हणूनच हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला. पथकाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संस्कृतीच्या जोपासनेसोबतच सामाजिक जाणिवांचा हा वसा असाच पुढे चालवावा, अशा शब्दांत नागरिक आणि थोर मंडळींकडून पथकाला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.