loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली-नांगरतास परिसरात ट्रक आणि व्हॅगनार कारचा भीषण अपघात

सावंतवाडी : आंबोली-नांगरतास परिसरात आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास ट्रक आणि व्हॅगनार कारचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. यात कारचा चक्काचूर झालाय. ट्रक (क्रमांक MH-10-AW-7943) हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवला जात होता. याच दरम्यान समोरून येणाऱ्या व्हॅगनार कारला (क्रमांक MH-04-HM-0217) ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात केशव दत्ताराम केसरकर (वय २७ वर्षे) आणि संतोष रामचंद्र धुरी (वय ३२ वर्षे, दोन्ही रा. माणगाव कट्टावाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) हे दोघे जखमी झाले आहेत. यापैकी संतोष धुरी यांना गंभीर दुखापत झाली असून केशव केसरकर हे देखील जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू असून आंबोली पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg