loader
Breaking News
Breaking News
Foto

पालशेत मारुती मंदिर ते बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजविले

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - पालशेत येथील मारुती मंदिर ते बाजारपेठ या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर हे जातीने घटनास्थळी उपस्थित राहून या कामाची पाहणी करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती मंदिर ते बाजारपेठ या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर हे तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून काम करत असून, गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांकडे लक्ष देत नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

पालशेत येथील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न समोर आल्यानंतर त्यांनी केवळ पाठपुरावा न करता प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg