रत्नागिरी : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात ‘श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा’ तर्फे सोम. दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ४ वा. ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या स्नेह मेळाव्याला सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.‘श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा’ तर्फे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींसाठी स्नेह मेळावे व मार्गदर्शनपर बैठका आयोजित करण्यात येतात.त्यानुसार ‘श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा’ तर्फे सोम. दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ४ वा. श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींसाठी स्नेह मेळावा व मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे या उपस्थित रहाणार असून रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे संचालक डॉ. सुनील गायकवाड व निर्माते श्री. विवेक वानखेडे हे देखील उपस्थित रहणार आहेत.
उपस्थित बंधू भगिनींना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन यावेळी मान्यवर अतिथी करतील. तसेच यावेळी जून ते ऑगस्ट या ३ महिन्यातील ज्येष्ठ बंधू भगिनींचे वाढदिवस साजरे करण्यात येतील, त्यांचे जाहीर अभिष्टचिंतन करण्यात येईल व त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभावे म्हणून प्रभू श्रीरामाला साकडे घालण्यात येणार आहे. यावेळी श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे सर्व उपस्थित भगिनींना सात्वीक अल्पोपहार देण्यात येईल. या स्नेह मेळाव्यासाठी श्री. सुरेश तथा अण्णा लिमये, श्री. विनायक हातखंबकर सर, श्री. रमाकांत पांचाळ सर, श्री. नित्यानंद दळवी, सौ. बिना कळंबटे, श्री. शिरीष वारंग, श्री. नंदकुमार बिर्जे, श्री. दिपक राऊत, श्री. सुरेंद्र घुडे, श्री. सुरेंद्र शेट्ये हे अथक परीश्रम घेत आहेत. तरी रत्नागिरी शहर व तालुक्यातील ज्येष्ठ बंधू भगिनींनी या स्नेह मेळाव्याला अगत्यपूर्वक उपस्थित राहून देवस्थानमधील महाप्रसादाचा तसेच मान्यवर अतिथींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे.
यावेळी आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारी ‘सायकलिस्ट क्लब’ तर्फे काढण्यात आली. त्यामध्ये ७५ वर्षांचे श्री. गजानन नथुराम भातडे व ६० वर्षांचे श्री. नारायण पाटोळे हे देखील सहभागी झाले होते. या सायकल वारीचे आयोजन करणारे श्री. विशाल भोसले व सहकारी आजच्या या सभेत सहभागी होणार आहेत. यावेळी ही ज्येष्ठ मंडळी सायकल वारीतील काही अनुभव ज्येष्ठ बंधू भगिनींना सांगतील असे रत्नागिरीतील नामवंत प्रेस फोटोग्राफर श्री. मकरंद पटवर्धन यांनी सांगितले. ‘श्रीराम ज्येष्ठ नागरिक कट्टा’चे एक धडाडीचे संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांचा सोम. दि. १७ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून ते ८९ वर्षे पूर्ण करुन ९० व्या वर्षात पदार्पण करतील. ते श्रीराम मंदिर देवस्थानचे मानकरी असून श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे ते एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना या दोन्ही संस्थांच्या वतीने अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी शुभेच्छा व्यक्त करुन त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.