loader
Breaking News
Breaking News
Foto

ओझर विद्यामंदिर प्रशालेत मनसेतर्फे वह्यांचे वाटप

मालवण, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्या वाटपाचे विशेष अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये मनसेतर्फे वही वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग उप जिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, शहराध्यक्ष सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षीय उपक्रमासोबतच तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी या प्रसंगी औदार्य दाखवत शाळेतील तीन गरजू विद्यार्थिनींना दप्तर, कंपास पेटी व इतर शालेय साहित्याचे वाटप केले. एवढेच नव्हे तर तिन्ही विद्यार्थिनींच्या संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च स्वतः उचलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रशालेसाठी स्वखर्चाने वॉटर प्युरीफायर देखील भेट दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून मनसेतर्फे जिल्ह्यात राबवल्या जाणार्‍या या सामाजिक अभियानाचे सर्वच स्तरातून, तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून विशेष कौतुक आणि आभार व्यक्त केले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg