loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याची इस्रायलमध्ये पीएच.डी.साठी निवड

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी चिन्मय उमेश वैशंपायन याची इस्रायलमधील एरियल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. करण्यासाठी निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चिन्मयने सन २०२२ मध्ये महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याची IISER, तिरुवनंतपुरम येथे निवड झाली. पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्याने सादर केलेल्या प्रेझेंटेशनच्या आधारे इस्रायलमधील एरियल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. संशोधनासाठी त्याची निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिन्मयच्या या यशाबद्दल दापोली एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, सचिव डॉ. विनोद जोशी, संचालक रविंद्र कालेकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. घनशाम साठे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. गंगा गोरे तसेच प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, प्रा. डॉ. बापू यमगर, प्रा. डॉ. विजय गुरव, प्रा. डॉ. मनोज लाड, प्रा. तेजस मेहता आणि चिन्मयचे वडील डॉ. उमेश वैशंपायन यांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला पुढील शैक्षणिक व संशोधनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

सत्कार सोहळ्यानंतर चिन्मयने महाविद्यालयातील तृतीय वर्ष रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाच्या संधी, संशोधन क्षेत्रातील करिअर, परदेशातील शिक्षण तसेच ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे महत्त्व याबाबत त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातून शिक्षण घेत गुणवत्ता, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करता येते, हे चिन्मय वैशंपायनने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. त्याची ही यशस्वी वाटचाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg