loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुलीत भरधाव मोटार दुभाजकावर आदळून पलटी; चौघे जखमी

बांदा : (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील रंगीला ढाब्यासमोर बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव मोटार दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात चौघेजण जखमी झाले. फ्रान्सिस परेरा (४८, म्हापसा), रसेल डिसोझा (४९, मडगाव), आन्सल डिसोझा (६०) आणि रॉनीता (३५, दमण, गोवा) अशी जखमींची नावे आहेत. मोटार बांद्याच्या दिशेने जात असताना इन्सुली परिसरात चालकाचा ताबा सुटला. मोटार बाऊन्स होऊन दुभाजकावर आदळली व पलटी झाली. अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले असून जखमींना स्थानिक नागरिकांनी तत्काळ बाहेर काढून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg