loader
Breaking News
Breaking News
Foto

सोसायटी जनरल सेक्युरिटी सर्विसेस यांच्या सहकार्याने अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या माध्यमातून खोपी येथे विज्ञान जत्रेचे आयोजन

खेड - स्वातंत्र्यदिनानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2026 सोसायटी जनरल सेक्युरिटी सर्विसेस यांच्या सहकार्याने अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खोपी येथे विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विस्तार अधिकारी कुंदरकर तसेच प्रशाळेचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यामार्फत विविध वैज्ञानिक प्रयोग मांडण्यात आले. तसेच शाळेतील मुलांना त्याची माहिती देऊन ते शिक्षक तसेच आजूबाजूच्या शाळेतील मुलांनी त्याची माहिती घेतली. यावेळी परिसरातील ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या प्राथमिक शाळांनी या विज्ञान प्रदर्शनाला व्हिजिट केले व विविध वैज्ञानिक प्रयोगाची माहिती जाणून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यास मदत झाली.

टाईम्स स्पेशल

तसेच विज्ञानाबाबतची जागृती व जिज्ञासा मुलांच्या वाढीस लागले व प्रशालेच्या मुख्याध्यापक आणि तसेच संस्थेचे अध्यक्षस्थानी व विस्तार अधिकाऱ्यांनी अगस्त्य मार्फत होत असलेल्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यासाठी अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनचे समन्वयक किरण ताम्हणकर, शुभम जंगम, ऋतिक गांजेकर, सानिका नायकल, धनश्री शिंदे व आशिष काते यांनी सहकार्य केले व सर्वांच्या सहकार्याने हा विज्ञान जत्रेचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg