loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय खेळाडूला मिळाला ध्वजारोहणाचा मान, तोणदे ग्रामपंचायतीचा अनोखा आदर्श

रत्नागिरी - स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील तोणदे ग्रामपंचायतीने सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर धावणे क्रीडाप्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारणारी गावची सुकन्या युती निलेश तोडणकर हिला ध्वजारोहणाचा मान देऊन सर्वापुढे अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गतवर्षी कोपरगाव, अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन तिने गावचा बहुमान उंचावला होता. याकरिता तिला हा मान दिला गेला. याप्रसंगी सरपंच शीला जाधव, उपसरपंच वैभव चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg