केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेली ३१ मे २०२६ पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याची मुदत उलटूनही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी संबंधित प्रशासनाला निवेदनवजा इशारा दिला असून, महामार्गावरील अपूर्ण कामे, नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका आणि प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणाबाबत जनहित याचिका दाखल करण्यापूर्वीची अंतिम कायदेशीर नोटीस दीली आहे.असे म्हटले आहे.
दरम्यान कदम यांनी यापूर्वीही दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील भूसंपादन समन्वय शाखेने ३० एप्रिल २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, राजापूर तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून अर्जाचे अवलोकन करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही महामार्गावरील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा दावा कदम यांनी केला आहे. कदम यांनी दिलेल्या निवेदनामध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील विविध अपूर्ण कामांमुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी, एस.टी. प्रवासी, व्यापारी तसेच मुंबई-पुण्याकडून कोकणात ये-जा करणार्या चाकरमान्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. वांद्री-सप्तलिंगी नदीवरील पुलाचे काम एका बाजूने झाले असले तरी दुसर्या बाजूस जुन्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. या पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तळेकांटे परिसरात रस्त्याचे काम सुरू असतानाच बाजूच्या डोंगरात उत्खनन सुरू असून कच्च्या व अरुंद रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. त्याच मार्गावर महावितरणचे विद्युत खांब असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच आंजणारी-वेरळ घाट परिसरातील काम संथ गतीने सुरू असून, या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे. लांजा बाजारपेठेतील सर्व्हिस रस्त्याची दुरवस्था, विविध ठिकाणी अर्धवट चौपदरीकरण, अपूर्ण पूल व उड्डाणपूल, खड्डे, चिखल, पाणी साचणे आणि पाण्याच्या निचर्याचा अभाव यामुळे पावसाळ्यात महामार्गावरील वाहतूक आणखी धोकादायक बनल्याचे त्यांनी म्हटले आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.