loader
Breaking News
Breaking News
Foto

बनावट मृत्यू प्रमाणपत्राने जमीन लाटण्याचा डाव; नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, दोन जणांना अटक

कर्जत (जयेश जाधव): कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे चई, कर्जत कोर्ट, ता. कर्जत येथे आरोपींनी फिर्यादी यांच्या आजोबा व आजी यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवून फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने जमीन मिळकत स्वतःच्या नावे करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी क्र. १ व २ यांना दि. २१/०८/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रा. प्लॉट नं. २०१, डेल्स बॉर्डर अपार्टमेंट, कुळदेव भवानी माता मंदिर समोर, जय भवानी रोड, नाशिक यांच्या मृत आजोबा व मृत आजी यांच्या मालकीच्या सर्व्हे नं१५/८/अ, १६/१, १६/४, १६/५, १६/६/अ, १६/११, १६/१३, १६/१७, १९/०३, १९/०५, २०/०३, २०/०९, २१/०७, २२/०१ या जमीन मिळकती आरोपी क्र. १ रा. २६४, कृष्णा नगर, अडाजण रोड, सुरत, गुजरात हिने स्वतःच्या नावे करण्याकरिता कर्जत न्यायालय येथे वारस मान्यता मिळविण्यासाठी अर्ज केला. या अर्जासोबत फिर्यादी यांच्या मृत आजोबा व मृत आजी यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. मृत आजोबा व मृत आजी यांची मुलगी त्यांची वारसदार आहे, असे दाखवून बनावट मृत्यू प्रमाणपत्र खरे असल्याचे न्यायालयास फसवून व दिशाभूल करून वारस मान्यता प्राप्त केल्याचा आरोप आहे.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर आरोपी क्र. १ हिने नमूद जमीन स्वतःच्या नावे करण्याकरिता वारस नोंद होण्यासाठी तहसील कार्यालय, कर्जत येथे अर्ज सादर केला. त्यासोबत सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रावर आरोपी क्र. २ व ३ यांनी आरोपी क्र. १ यांना ओळखणारे साक्षीदार म्हणून सही केली. आरोपींनी संगणकाच्या सहाय्याने फिर्यादी यांच्या मृत आजोबा व मृत आजी यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून ते मा. कर्जत न्यायालयात सादर केल्याचे नमूद आहे. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने वारस मान्यता मिळविण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १८६/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक पोलीस तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg