loader
Breaking News
Breaking News
Foto

साखळोली शिवाजीनगर येथील रानमाया प्रदर्शन व पाककला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) - ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय दापोलीच्या कृषी विस्तार शिक्षण विभाग आणि विद्यार्थीनींच्या संजीवनी व कृषी संगीणी गटांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म व दैनंदिन आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रानमाया प्रदर्शन व पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शामल लांजेकऱ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रानमाया प्रदर्शनात एकुण ४० रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले. प्रत्येक रानभाजीचा उपयुक्त भाग, आढळ, औषधी गुणधर्म यांची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रदर्शन पाहणार्‍यांना त्याची माहिती अवगत झाली. हे पाककला स्पर्धेत ३१ महिलांनी सहभाग घेत ५० विविध रानभाजीजन्य पदार्थ सादर केले होते. परीक्षकांनी पदार्थांचे परीक्षण करून उत्कृष्ट पदार्थांची निवड केली. स्पर्धेचा निकाल कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण झगडे यांनी जाहीर केला. या स्पर्धेत स्मिता पडवेकर (केळीच्या कोक्याचे मोदक) या पदार्थाला प्रथम क्रमांक तर प्रणाली हरचिलकर (भारंगी ची पानवडी) या पदार्थाला व्दितीय क्रमांक जाहीर करण्यात आला त्याचप्रमाणे मयुरी रामाने यांनी सादर केलेल्या (भारंगी वाडी) पाक कलेला तृतीय तसेच ऋषिका जामसुदकर यांनी बनवलेल्या (टाकळ्याचे लॉलीपॉप) या पाक कलेला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना सफेद वेलची या केळीच्या जातीचे रोप देण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg