loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मंडळाचा ३३ वा वर्धापन दिन व भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मडंळ (रजि.), गुहागर या लाडक्या मातृसंस्थेचा ३३ वा वर्धापन दिन आणि ३४ व्या वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून, समाजातील देदीप्यमान यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य ’गुणगौरव सोहळा’ नुकताच अत्यंत उत्साहात आणि कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला. हा शानदार सोहळा पाटपन्हाळे हायस्कूल, शृंगारतळी येथील ’छत्रपती सभागृहात’ सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत अत्यंत दिमाखात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गुहागर तालुक्यासह विविध भागांतून असंख्य समाज बांधव, माता-भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, ज्यामुळे संपूर्ण सभागृह गर्दीने ओसंडून वाहत होते. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सभापती महेश नाटेकर, समाज भूषण दीपक चिवेलकर आणि पांचाळ सुतार समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष गंगाराम धामणस्कर व जिल्हा कोषाध्यक्ष विनायक काणेकर गुरुजी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर महेश कोलवणकर (अध्यक्ष, पाटपन्हाळे शाळा), जिल्हा सदस्य नेत्राताई ठाकूर, पंढरीनाथ धामापूरकर, माजी जिल्हा अध्यक्ष वासुदेव सुतार, तालुका माजी अध्यक्ष गणपत पांचाळ, माजी अध्यक्ष वसंत देऊडकर, जिल्हा सदस्य वासुदेव पांचाळ, श्रीकांत पांचाळ, अपर्णाताई नाटेकर, आणि जिल्हा युवा सदस्य प्रसाद नांदलस्कर यांची सन्माननीय उपस्थिती लाभली होती. या सोहळ्यात समाजातील ज्येष्ठ कलाकार आणि गुणवंतांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ’कलाकार मानधन योजना’ मार्गदर्शन केंद्रीय प्रमुख (गुहागर) मनोज पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवावा आणि कलाकारांनी मानधनाचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल त्यांनी उपस्थितांना अत्यंत मोलाची व तांत्रिक माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या गुणगौरव समारंभात समाजातील एकूण ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवोदित डॉक्टर्स यांचा समावेश होता. यासोबतच नवोदय परीक्षा, प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकलेल्या बालदोस्तांचा, क्रीडा क्षेत्रात तालुक्याचे नाव उंचावणार्‍या खेळाडूंचा तसेच विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणार्‍या गुणवंतांचा ’विशेष सत्कार’ देऊन मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. संपूर्ण सोहळ्याचे अतिशय बहारदार आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन कैलास शार्दुल व वासुदेव पांचाळ यांनी आपल्या ओघवत्या आणि उत्साही शैलीत केले. तर कार्यक्रमाचा समारोप अंकुश पिलवलकर यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg