loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ वे देहदान

रत्नागिरी : (जमीर खलफे) - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या अभ्यास व संशोधनासाठी २२ वे मरणोत्तर देहदान नुकतेच संपन्न झाले. मूळचे लिमये वाडी (कर्ला, रत्नागिरी) येथील रहिवासी व भारतीय संरक्षण दलातील माजी सैनिक कै. अनंत नरहर गोखले (वय ७८) यांचे गुरुवारी, २० ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हे मरणोत्तर देहदान करण्यात आले. संरक्षण दलात देशसेवा बजावलेल्या कै. अनंत गोखले यांच्या पार्थिवाचा उपयोग भावी डॉक्टरांच्या अभ्यासासाठी व वैद्यकीय संशोधनासाठी व्हावा, या उदात्त हेतूने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. २० ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पार्थिव सुपूर्द करण्यात आले. याुवेळी कै. गोखले यांची कन्या रूपाली लिमये, जावई मंदार लिमये, तसेच राजीव लिमये, मिताली भिडे, दिनेश आगाशे, शिरीष सोहोनी व मित्रपरिवार उपस्थित होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी समीर करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. समाजोपयोगी निर्णयाबद्दल अधिष्ठाता व महाविद्यालय प्रशासनाने गोखले कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg