loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंग परिक्षेत तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ / ( ब्रेकिंग न्यूज - ६ )

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' रॅलीची घोषणा पुणे - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घोषणा केली की, त्यांची 'छात्रों की गूंज' ही आगामी रॅली 22 ऑगस्ट रोजी पुण्यात केवळ मुलींसाठी असेल. युवकांना लक्ष्य करून आयोजित केलेल्या त्यांच्या बैठकांचा हा एक भाग असून, तरुण महिलांचा आवाज बुलंद करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ---------------------------------------------------- पुणे नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले पुणे - पुणे नदीत एकाच कुटुंबातील सात सदस्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा नातेवाईकांना ताब्यात घेतले असून, प्राथमिक तपासानुसार सामूहिक आत्महत्येच्या दिशेने तपास सुरू आहे. ---------------------------------------------------------- पुण्यात बस-ट्रक धडकेत 4 ठार, 20 जखमी पुणे - पुण्यात झालेल्या बस-ट्रकच्या भीषण धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शहरासाठी धक्कादायक बातमी ठरली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंग परिक्षेत तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ संभाजीनगर - मुंबई उच्च न्यायालयातील लिपीक पदांसाठी ऑनलाईन टायपिंग चाचणी ला बसलेल्या अनेक उमेदवारांनी परिक्षेदरम्यान तांत्रिक आणि सर्व्हर संबंधित समस्या आल्याचा आरोप करीत रविवारी सहभागी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कॉकरोच जनता पार्टी या आंदोलनात सहभागी झाली. ---------------------------------------------------------- भीषण अग्नीकांड, ७ यात्रेकरुंचा मृत्यू कोलकाता - पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे, जिथे आज पहाटे तारापीठ मंदिराजवळील एका हॉटेलला भीषण आग लागली. या भीषण दुर्घटनेत किमान सात भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. ------------------------------------------------ अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू लखनौ - अशोकधाम मंदिरात श्रावण महिन्याच्या सोमवार निमित्त लखिसराय येथे मोठी गर्दी झाली. या गर्दीत विजेचा धक्का लागण्याचा अफवेने घबराट पसरली आणि लोक एकमेकांवर पडू लागले. या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg