loader
Breaking News
Breaking News
Foto

महापौर रितू तावडे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात राजकीय टीका सुरुच... पेडणेकर म्हणाल्या- ‘मुंबईची लूट थांबवा’

मुंबई - मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या एका निर्णयामुळे असे म्हटले जात आहे. महापौर तावडे यांच्या सोशल मिडीया प्रसिद्धीसाठी २५ लाख रुपये खर्च केला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सोशल मिडीया प्रसिद्धीवरुन मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि महापौर रितू तावडे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. मुंबईकरांच्या पैशाची लूट सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या,‘सतत महापौरांवर बोलण्याचा कंटाळा आलाय,त्यांचे प्रतापच असे आहेत. किती मांडावे आणि किती झाकावे, माझ्याकडे स्थायी समितीचा प्रस्ताव आहे, त्यात म्हटले आहे की, महापौरांच्या कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी २५ लाख खर्च होणार आहेत. या आधी १० लाखांहून खर्च झाला आहे. आता २५ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव आहे. मी ऐकत आहे की, महापौर म्हणतात हे माझे काम नाही, तिन तिघाडी काम बिघाडी असे चालले आहे. स्थायी समिती काय बोलते हे सभागृह नेत्यांना माहित नाही, सभागृह नेते काय बोलतात ते महापौरांना माहित नाही. महापौर काय बोलतात ते दोघांनाही माहित नाही. आमच्याबरोबर संवाद नाही. नेमके चाललेय काय? मुंबईकरांच्या पैशाची लूट का करता आहात?’

टाईम्स स्पेशल

तसेच त्यांनी भाजपवरही थेट हल्लाबोल केला, माझ्या हातातील पेपरमध्ये उघडपणे लिहीले आहे, हा पेपर माझ्या घरचा नाही. महापालिकेच्या कामकाजाचा आहे. भाजपने एक नवीन पद्धत काढलीय, ५ लाख ते ७५ लाखांपर्यंत चे काम स्थायी समितीत आणून पास करायचे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केलीय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg