loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय स्लिंग शॉट चॅम्पियनशिपमध्ये मिलाग्रीस प्रशालेचे सुयश

सावंतवाडी: मिलाग्रीस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच ओडिसा येथे पार पडलेल्या 'पहिल्या राष्ट्रीय स्लिंग शॉट चॅम्पियनशिप' स्पर्धेमध्ये प्रशालेची विद्यार्थिनी दुर्गा जाधव हिने घवघवीत यश संपादन केले आहे. ​या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील १२ वर्षाखालील गटामध्ये दुर्गाने उत्कृष्ट कौशल्य दाखवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सुयशामुळे तिने फ्रान्स येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वतःची निवड सिद्ध केली आहे. तिच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय फादर रिचर्ड सालढाणा यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg