loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर बाग गावचे खोत व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहनशेठ बागकर यांना भंडारी भुषण पुरस्कार प्रदान

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने सन २०२६ मधील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान सोहळा कै.इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन, गुहागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यामध्ये बाग गावचे खोत व भंडारी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन आत्माराम बागकर यांना स्वर्गीय सदानंद आरेकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ भंडारी भुषण पुरस्कार - २०२६ ने गौरविण्यात आले. गुहागर तालुका भंडारी समाज अध्यक्ष नवनीत ठाकूर व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर बाग येथील मोहन बागकर हे सन १९८१ पासुन बाग ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व गावचे खोत म्हणून आजतागात कार्यरत आहेत, गुहागर ग्रामपंचायतीच्या काळखंडात त्यांनी पाच वर्षे सदस्य म्हणूनही पद भूषविले होते. बाग गावाच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच गुहागर तालुका भंडारी समाज व कित्ते भंडारी समाज मुंबई या दोन्ही संस्थाचे अनेक वर्षे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भंडारी समाजाचे एकत्रीकरणासाठी व उत्कर्षासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे या सामाजिक योगदानाचा विचार करुन त्यांना यावर्षीचा भंडारी भुषण २०२६ ने सन्मानीत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या सन्मान सोहळ्याला गुहागर तालुका भंडारी समाज अध्यक्ष नवनीत ठाकूर, उपाध्यक्ष- मुरलीधर बागकर, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती- निलेश सुर्वे, अमोल वराडकर, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, दिपक कनगुटकर, सुजाता बागकर, नगरसेवक अमोल गोयथळे, निलेश मोरे, तुषार सुर्वे, निलेश गोयथळे व सर्व भंडारी पदाधिकारी पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg